गुन्हे शाखा युनिट 2 दमदार कामगिरी ! विधीसंघर्षित बालकाकडुन ०१ अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतुस केले जप्त
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२७/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्हे शाखा युनिट २ हदचीत गुन्हे प्रतिबंधक गस्त व रेकार्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व योगेश मांढरे यांना गोपनिय माहिती मिळाली की, कोंडीचा ओढा जांभुळवाडी रोड आंबेगाव पुणे येथे एक इसम अग्निशस्त्र जवळ बाळगून थांबलेला आहे.
नमुद अंमलदार यांनी मिळालेल्या माहिती गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी नमुद ठिकाणी जावून छापा कारवाई केली असता एक विधीसंघर्षित बालक मिळून आला. त्याचेकडे एक अग्निशस्त्र व एक जिवंत काडतुस असा एकुण ४०,५००/-रु.कि. या मुददेमाल मिळून आला. सदर मुददेमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. क्रमांक ३१६/२०२५ शस्त्र अधिनियम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख. मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, योगेश माढरे, शंकर नेवसे, साधणा ताम्हाणे, शंकर कुंभार, नागनाथ राख, विजयकुमार पवार, सददाम तांबोळी, आजीम शेख, विशाल दळवी, गणेश थोरात, प्रविण उत्तेकर विनायक वगारे असे गुन्हे शाखा युनिट २ पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

