गुन्हे शाखा युनिट ६ ची दमदार कामगिरी ! मोक्का गुन्हयातील पाहिजे तडीपार आरोपीस केले जेरबंद!
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार, यांनी मकोका तसेच इतर गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी शोध मोहिम राबवणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. १२/०२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत पेट्रोलिंग करित असताना युनिट कडील पोलिस अमंलदार मुंढे यांना बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन कडील मकोका गुन्हयातील पाहिजे आरोपी तसेच तडीपार राक्या ऊर्फ राकेश थोरात हा भापकर मळा, मांजरी या ठिकाणी थांबलेला आहे.
सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळवुन, बातमीचे ठिकाणी भापकर मळा, मांजरी यथे जावुन सापळा रचला असता, तो पोलीस पथकाला पाहून पळून जात असताना, पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. नमुद इसमास त्याचे नाव पत्ता विचारता तो उडवाउडवीचे उत्तर देवु लागला. युनिट कडील पोलीस पथकाने त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने त्याचे नाव राक्या ऊर्फ राकेश देविदास थोरात वय २३ वर्षे रा. जुना हापसा, मांजराई नगर, मांजरी बु. ता. हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, तडीपार असताना गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे चा आवाज कमी करण्याच्या कारणावरुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार स्वप्नील ऊर्फ बिट्या कुचेकर व आम्ही इतर साथीदारांनी मिळून एकास जबर मारहाण केली होती. सदर घटनेबाबत हडपसर पो.स्टे.चा अभिलेख तपासला असता हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १४५५/२०२३ भा.द.वि कलम ३०७,३२४,३२३,५०४, ५०६,१४१,१४६,१४७,१४८,१४९, क्रिमीनल लॉ. अॅमेंन्टमेट अॅक्ट ७, महाराष्ट्र पो. अधिनियम कलम ३७ (१) (३)१३५ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयात राक्या ऊर्फ राकेश देविदास थोरात हा मकोका गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची खात्री झाल्याने पुढील तपासकामी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नमुद आरोपी विरुद्ध यापूर्वी हडपसर पो. स्टे येथे १) गु.र.नं.३६०/२०२० भा.दवि.क. ३२४,३२३ व इतर २) गु.र.नं.५१६/२०२१ आर्म अॅक्ट क.४ (२५) ३) गु.र.नं.१०९२/२०२१ भ. द. वि. ३०७ व इतर, ४) गु.र.नं.१३०८/२०२२ भा.द.वि.क.१४३,१४७ व इतर ५) गु.र.नं.८८/२०२३ भा.द.वि.क.३९९,४०२ व इतर प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. प्रविण पवार, मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेर, श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

