गुन्हे शाखा युनिट २ कडून सराईत बंटी पवार गॅगमधील सकिय गुन्हेगाराकडून एक पिस्टल, दोन जिवंत राऊंड, असा एकुण ५०,८००/-रु. मुददेमाल जप्त.
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- शहरातील शरिराविरुध्द गुन्हे करणारे गुन्हेगार, पाहिजे फरारी व तडीपार यांना चेक करुन त्याचेविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार बिडवई यांनी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व युनिट २ कडील अंमलदार यांचे पथक तयार केले. सदर पथकामधील पो. हवा उज्वल मोकाशी व संजय जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे, स्वारगेट पोलीस स्टेशनचे हददीत गुलटेकडी परिसरात एक संशयित इसम अग्निशस्त्रे व राऊंड जवळ बाळगुन फिरत असताना मिळुन आला, सदर इसमास युनिट-२ कडील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे ताब्यात घेतले. सदर इसमास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव ओमकार विनोद पवार वय २५ वर्ष रा.बी ६२/१४ सुपर दुर्गामाता मंदिर समोर अप्पर बिबवेवाडी पुणे असे सांगीतले. सदर इसमाच्या अंगझडतीत ५०,८००/- रु एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व ०२ जिवंत काडतुस मिळून आले. सदर मुददेमाल पंचनाम्याने जप्त करुन, नमुद इसमाची ससुन हॉस्पीटल पुणे येथे वैदयकिय तपासणी करण्यात आली. सदर बाबत स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि कमांक ११५/२०२४ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) संह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास सपोनि अमोल रसाळ गुन्हे शाखा युनिट २ हे करीत आहेत. सदर आरोपी हा रेकार्डवरील गुन्हेगार असुन, सराईत बंटी पवार गैंग मधील सक्रिय सक्रिय सदस्य आहे. बंटी पवार सध्या मोक्का केसमध्ये येरवडा कारागृह येथे बंदी आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस गुन्हे श्रीशैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त श्री अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोउपनिरी राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, संजय जाधव, शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, साधना ताम्हाणे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, पुष्पेद्र चव्हाण व नागेश राख या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

