गुन्हे शाखा युनिट ५ ची पुन्हा धडाकेबाज कामगिरी ! खुनाचे आरोपी निष्पन्न करुन त्यांना २४ तासात केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २४/०६/२०२४ विक्रम बात्रा वसाहत समोर, केंद्रीय महाविद्यालयाचे बाजुला लुल्लानगर, वानवडी पुणे येथे एक अनोळखी इसमाचा अज्ञात इसमाने लाकडी दांडक्याने व धारधार हत्याराने वार करुन त्याचा खुन केला म्हणुन वानवडी पो.स्टे.गु.र.नं.३९४/२०२४ भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदर खुनाची खबर मिळताच युनिट ५. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी त्वरीत घटनास्थळी जावुन भेट दिली. परंतु घटनास्थळी मयताची ओळख पटविणेसाठी काहीएक उपयुक्त माहीती मिळुन आली नाही. त्यामुळे श्री. विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक, युनिट ०५, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी युनिट कडील अमंलदार याचे दोन पथके तयार करुन वानवडी व कोंढवा भागात रवाना केली. मयत इसम हा अश्रफनगर भागातील रहीवाशी असल्याचे समजल्याने तेथे जावुन चौकशी करता मयत इसमाचे नाव माविया लियाकत हुसेन पठाण वय २२ वर्षे रा. अश्रफनगर गल्ली नं.११ कोंढवा पुणे असे असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचे घरी जावुन त्याचे कोणाशी वैर आहे का याबाबत माहीती घेतली. मयत माविया पठाण याचा त्याचे दाजी अरविंद अमृत कांबळे वय २६ वर्षे रा.जी.एस टॉवर बिल्डींग मार्केटयार्ड गुलटेकडी पुणे याचे बरोबर कौटुंबिक वाद असल्याचे समजले. त्याचे राहते घरी जावुन शोध घेता त्याचे राहते घराला कुलुप असल्याचे आढळुन आले. पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे यांना त्याचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, अरविंद कांबळे व त्याचा रोहीत हनुमंत पुटगे हे बुलेट मोटर सायकल वरुन कर्नाटक साठी रवाना झाले आहेत. त्यामुळे आम्ही लागलीच कान्हा हॉटेल चौक, कोंढवा पुणे येथे स्टाफसह जावुन नाकाबंदी करुन बुलेट मोटर सायकलची तपासणी करीत असताना एक इसम हा बुलेट मोटर सायकलवर येताना दिसला परंतु तो आम्हास पाहताच मोटर सायकल वळवुन जात असताना दिसल्याने आम्ही त्याचा पाठलाग करुन त्यांना पकडले. त्याचेकडे लायसन्सची मागणी करुन त्याचे लायसन्स तपासले असता मोटर सायकल चालवणारे इसमाचे नाव १) अरविंद अमृत कांबळे असे असल्याचे समजले. तसेच पाठीमागे बसलेल्या इसमाचे त्याचे नाव २) रोहीत हनुमंत पुटगे वय १९ वर्षे रा. कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर कात्रज पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने अरविंद कांबळे यांचे कडे तपास करता त्याने सांगितले की, माझी बहीण हिने दीड वर्षापूर्वी माविया लियाकत पठाण यांच्याबरोबर प्रेम विवाह केला होता. पंरतु तो तिला त्रास देत होता. त्यास आम्ही अनेकदा समजावुन सांगितले पंरतु त्याच्या वागण्यात फरक पडला नाही
त्यास सोडचिठ्ठी देणेस सांगीतले तरी तो सोडचिठ्ठी देत नव्हता त्यामुळे दिनांक २४/०६/२०२४ रोजी रात्रौ ९/०० वाजण्याचे सुमारास त्यास बुलेट मोटर सायकलवर उचलून लुल्लानगर येथे निर्जन स्थळी नेवुन त्यास लाकडी दांडक्याने मारहाण करुन खुन केल्याचे सांगीतले. त्यांना ताब्यात घेवुन वानवडी पोलीस स्टेशनचे ताब्यात देणेत आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री. सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ कडील पोलीस निरीक्षक श्री. विश्वजित काईंगडे, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे पोलीस अमंलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडूळे, शशिकांत नाळे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अमित कांबळे, रमेश साबळे, अकबर शेख, पांडूरंग कांबळे, स्वाती गावडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

