स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची उलेखनीय.कामगिरी ! विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी टोळी जेरबंद करून ४८ गुन्हे उघडकीस आले.


आसमा सय्यद पुणे प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरूर, दौंड उपविभागात मागील महिन्यात विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने गुन्हे दाखल करणेत आले आहेत. विद्युत रोहीत्र चोरी गेल्याने परीसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असे, तसेच परीसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या.

विद्युत रोहीत्र हे दुर्गम भागात असल्याने चोरी झालेनंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही याद्वारे तपास होणे अडचणीचे होते. मा. पोलीस अधीक्षक साो. पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागाती पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेवून योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करणेत आली होती.

तपास पथकांनी शिरूर पोलीसांचे मदतीने गुन्हयांचे घटनास्थळे पडताळून घटनास्थळा कडे येणारे जाणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करून तपास चालू केला. सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके रवाना करणेत आली. विद्युत रोहीत्र चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परीसरात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रचून आरोपी नामे १) विशाल खंडू पवार वय २५ धंदा जेसीबी चालक रा तांबेवाडी वडगाव सावताळ ता पारनेर जि अहमदनगर २) प्रदीप राजेंद्र शिंदे वय २६ धंदा ड्रायव्हर रा साकूर गाडेकर ता संगमनेर अहमदनगर ३) ओमकार अजित घोडेकर वय १९ धंदा ड्रायव्हर रा साकुर घोडेकर मळा ता संगमनेर जि अहमदनगर ४) आदेश सयाजी भुजबळ वय १९ धंदा शेती रा साकूर हळदावस्ती ता संगमनेर जि अहमदनगर ५) हर्षल राजेंद्र शिंदे वय २४ धंदा शेती रा साकूर गाडेकरमळा ता संगमनेर जि अहमदनगर ६) श्रीकांत शिवाजी जाधव वय २२ धंदा मासमारी विक्री रा सातकरवाडी दहीवडी ता शिरुर जि पुणे ७) करण नाना माळी वय १९ धंदा शेती रा दहिवडी मांजरेवस्ती ता शिरुर जि पुणे मूळ रा वांगदरी ता श्रीगोंदा जि अहमदनगर ८) सोनू विकास धुळे वय १८ धंदा मजूरी रा आंबळे ता शिरुर जि पुणे मूळ गाव वाडेबोल्हाई थेऊर ता हवेली जि पुणे यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्हयातील चोरी केलेला माल आरोपी नामे ९) दिपक पांडुरंग सांगळे वय २७ धंदा भंगारविक्री रा व्हाईटहाउस बोलेगाव फाटा नागापूर ता जि अहिल्यानगर यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने त्याला सुद्धा गुन्हयाचे कामी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी गुन्हा करणेसाठी पिकअप चारचाकी वाहनाचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे पिकअप चारचाकी वाहन, सहा मोटार सायकल जप्त करणेत आलेल्या असून त्यापैकी एक मोटार सायकल चोरीची आहे. तसेच गुन्हयात चोरी केले मालापैकी ५०० किग्रॅ वजनाच्या तांब्याच्या पट्टया व तारा हस्तगत करणेत आलेल्या असून एकूण १४,५०,०००/- (१४ लाख ५० हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला असून ४८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत .गुन्हयातील आरोपी नामे विशाल पवार याचे वर एकूण ११ मालमत्ता (मोटार सायकल) चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी प्रदीप शिंदे याचेवर ०३ गुन्हे दाखल असून तो ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीचे गुन्हयात फरार आहे.

Advertisement

 

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री प्रशांत ढोले, शिरूर विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. स्वप्निल जाधव, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पो.नि. ज्योतीराम गुंजवटे, स्था.गु.शा. चे सपोनि राहूल गावडे, योगेश लंगुटे, पोसई अभिजीत सावंत, पोसई एकनाथ पाटील स्थागुशा कडील अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ संजू जाधव, योगेश नागरगोजे, स्वप्निल अहीवळे, विजय कांचन, संदीप वारे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, मपोना सुजाता कदम शिरूर पो स्टे चे नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, शिक्रापूर पो स्टे कडील अंमलदार किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप, यांनी केली आहे.

सदर गुन्हाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!