पुण्यातील नामांकित शाळेतच अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून अत्याचाराचा प्रयत्न; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल


पंकेश जाधव संपादक 7020794626

समर्थ पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणेः पुणे शहरातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत ( बी टी शहाणी स्कूल )अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तर आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे.

देवराज पदम आग्री (वय-१९) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने याबाबत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील भवानी पेठ परिसरात हे नामांकित हायस्कूल आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी पीडित या मुलगी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी देणारे अग्रगण्य जात होती. यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृह जवळ थांबला होता.

पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला. यावेळी आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका करून घेत तेथून पळ काढला.

घरी गेल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात ७४, ७५ (१) (i) पोक्सो ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!