गुन्हे शाखा यूनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी ! खुनाचा गुन्ह्यातील २ पाहिजे आरोपीतांना केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा यूनिट ६ पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २७/१२/२०२४ रोजी थेऊर रोड, जय मल्हार हॉटेल जवळ पुणे येथे ६-७ इसमांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीस हाताने व दगडाने मारहाण करून जखमी केलेने तसेच त्यापैकी एकाने गोळीबार गोळीबार करून फिर्यादीची वेळ ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे गु. र.क्र. ६१४/२४, १०९, ११८(१), १२५, १२५(अ), १८९ (१), १८९ (२) १९१ (२) १९१(२) १९०, ३५२, ३५१ (१), बी.एन. एस. सह कलम ३, २५, २७ भा.ह. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर घटनेनंतर आरोपी हा पळून जात असताना युनिट ६ च्या पथकाने ०३ आरोपीतास ताब्यात घेतले होते. तेव्हापासून इतर पाहिजे आरोपीतांचा गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता.

सदर गुन्ह्यातील जखमी महिला ही दिनांक ०१/१२/२४ रोजी मयत झालेने नमूद गुन्ह्याच्या कलमात १०३ बी. एन. एस. (खुनाचे कलम) समाविष्ट करण्यात आले होते.

मा. वरीष्ठांचे आदेशाने व.पो.नि. बिडवई व पथक (ADS १), पो. नि. पठाण व पथक (युनिट ६) तसेच ADS २ पथक असे गेल्या ३ दिवसापासून सतत पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना आज रोजी मिळालेल्या गोपनीय बातमीवरून खालील नमूद आरोपीतांना खेड, शिवापूर, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीतांचा तपशील
१) मयूर शंकर जाधव, वय ३२ वर्षे रा. मु.पो. कुरुळी, बांदल वस्ती, दत्त मंदिराच्या बाजूला ता. खेड जिल्हा पुणे
२) प्रथमेश उर्फ सोन्या आनंदा वाहिले, वय २३ वर्षे, रा. केळगाव, चिंबळी, आळंदी रोड, राधाकृष्ण मंदिराजवळ ता. खेड, जिल्हा पुणे
सदर आरोपीतांना पुढील कायदेशीर कारवाईकामी वैद्यकीय तपासणी करून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येत आहे.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, व.पो.नि. बिडवई ADS १ पो नि वाहीद पठाण युनिट ६/ ADS २ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६, ADS १, ADS २, कडील अंमलदार सहा फौ दिनकर लोखंडे, सहा फौ राजेश लोखंडे, पो हवा, गणेश ढगे, राठोड, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पो अं महेश पाटील, संदीप येळे, विनायक येवले, समिर पिलाणे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!