वाकड पोलीस ठाणे तपास पथकाची दमदार कामगिरी !जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक सुमारे ३ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत


पत्रकार बालाजी शिंदे पुणे जिल्हा

वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-दिनांक २९/०१/२०१५ रोजी सायंकाळी ब्रॉडवे सोसायटीसमोर दत्तमंदिर रोड व ओमेगा पॅरेडाईस राममंदिर चौक, वाकड, पुणे या ठिकाणाहून दोन अनोळखी इसमांनी भगव्या काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर येऊन दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे ४ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन जबरी चोरी करुन पळून गेले होते. त्यावरुन वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम कलम ३०९ (४), ३(७) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा.श्री. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त यांनी अनोळखी आरोर्षीचा सर्वोतोपरी शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेवावत आदेशीत केले आहे.

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी श्री. विशाल गायकवाड साो, पोलीस उप आयुक्त, परि-२ व श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त सारे, वाकड विभाग यांचे मागदर्शनाखाली श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी सदर चैन स्नॅचिंगचा संवेदनशिल गुन्ह्यातील आरोर्पीना अटक करुन गुन्हा उघडकीस घेणेकरिता तपास पथकाचे सपोनि. सुभाष चव्हाण व पोउपनि, अनिरुध्द सावर्डे यांची दोन तपास पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले.

तपास पथकाने अथक परिश्रम घेऊन भगव्या काळ्या रंगाच्या मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी आरोपीचा शोध घेणेकरिता आरोपींनी गुन्हा केला तेथून ते आरोपी निष्पन्न होईपर्यंत फिरलेल्या मार्गावरील ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निरीक्षण करुन अनोळखी आरोपी व त्यांचे ताव्यातील दुचाकीचा माग काढून आरोपी हे पिंपळे गुरव परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्या परिसरातील प्रत्येक रोड, तसेच इमारती पार्किंगमध्ये गुन्ह्यातील वर्णनाची मोटार सायकलचा शोध घेत असताना दिनांक ०८/०२/२०२५ रोजी सदरचे संशयीत आरोपी हे काही वेळापुर्वी विशाल नगरकडे जाणारे रोडवर आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी विशालनगर परिसरात सापळा लावून थांबले असता संशयीत आरोपी यांना संशय आल्याने ते त्यांचे मोटार सायकलवरून पळून जात असताना त्यांना तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. १) हिफाजत अली इनाम अली अन्सारी, वय २४ वर्षे, रा. तुळजा भवानी नगर, पिंपळे गुरव, पुणे. मुळ रा. नगीना, जि. बिजनौ, राज्य उत्तरप्रदेश. २) समीर फिरोज अन्सारी, वय २० वर्षे, रा. परफेक्ट बेकरी, गंगोत्री नगर, दापोडी रोड,  पिंपळे, गुरव, पुणे मुळ रा. नगीना, जि. विजनौ, राज्य उत्तरप्रदेश.

सदर आरोपी यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात दि. ०८/०२/२०२७ रोजी. अटक करण्यात आली आहे. अटक आरोर्पीची गुन्ह्याचे तपासकामी दिनांक १५/०२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त आहे.

पोलीस कोठडी दरम्यान आरोर्पीकडून दाखल गुन्ह्यातील जबरीने चोरी केलेले एकुण ३ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दोन मंगळसूत्र व गुन्हा करण्यासाठील वापरलेली केटीएम ड्युक मोटार सायकल १००% मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
अटक आरोपी हिफाजत अली यास बेकरीचे व्यवसायामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता २० तोळे सोने चोरी करुन त्या माध्यमातून पैसा मिळवून शेअर मार्केटमध्ये ड्रेडींग करायचे होते. त्याकरिता आरोपीनी दाखल गुन्हा केलेनंतर पिंपरी चिंचवड, बाणेर, भोसरी परिसरात पुन्हा चैन स्नॅचिंग करण्यासाठी फिरत होते. अटक आरोपींनी दाखल गुन्ह्याव्यतिरिक्त इतरही गुन्हे केले असण्याची शक्यता असून त्याअनुषंगाने अधिक तपास सुरु आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी अथक परिश्रम घेऊन मा. श्री. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, श्री. विशाल गायकवाड साो, पोलीस उप आयुक्त, परि-२, श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त सारे, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखली वाकड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निवृत्ती कोल्हटकर, सपोनि., सुभाष चव्हाण, पोउपनि. अनिरुध्द सावर्डे, श्रेणी पोउपनि विभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार संदिप गवारी, ज्ञानदेव झेंडे, सचिन गायकवाड, सौदागर लामतुरे, कौतेंय खराडे, वंदु गिरे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय भुसारे, रामचंद्र तळपे, विजय घाडगे, दिपक साबळे, मंगेश लोखंडे (परि.२ कार्या.) व पो.हवा. उमेश पुलगम सीसीटीव्ही डाटा सेंटर यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुभाष चव्हाण हे करीत आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!