लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीस अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलीसांना मिळाले यश


आसमा सय्यद पुणे प्रतिनिधी
भिगवण पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण 
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भिगवण पोलीस स्टेशन गु.र.नं. २५१/२०२५ भा.न्या.सं.क ६४, ३५२, ३५१(२) प्रमाणे दि. १०/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे, सदर गुन्हयातील पिडीत फिर्यादी महिला ही दि. १०/१०/२०२५ रोजी पहाटे ०३/२० वा सुास भिगवण ता इंदापूर जि पुणे येथे पुण्याकडे जाण्याकरीता हायवे रोडलगत वाहनाची वाट पाहत उभी होती. अनोळखी इसमाने तिला पुण्याला जाणेसाठी लिफ्ट देण्याचा बहाणा केला आणि पिडीतेस त्याचेकडील मोटार सायकलवर बसवून घेवून पुणे बाजूकडे जाताना मळद गावचे हद्दीतील रेल्वे ब्रीजचे जवळ मोटार सायकल थांबवून पिडीतेस जबरदस्तीने रोडचे लगत असलेल्या झाडीमध्ये घेवून जावून तिचेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आणि पिडीतेस त्या ठिकाणी सोडून देवून अनोळखी इसम हा निघून गेला होता. सदर घटनेबाबत पिडीत महिलेने फिर्याद नोंदविल्याने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे.
वाटसरू महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण, यांचेसह इतर वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री. सुनिल फुलारी साो. कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. त्यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली भिगवण पो स्टे, दौंड पो स्टे, व स्थानिक गुन्हे शाखा अशी संयुक्त तीन पथके तयार करणेत आली. पिडीत महिलेकडून आरोपीचे वर्णन घेवून रेखाचित्र तयार करणेत आले होते. तपास पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु उपयुक्त माहिती उपलब्ध झाली नाही. गोपनीय बातमीदारांना रेखाचित्र पाठविणेत आले होते. तपास पथकाकडून अनोळखी इसमाचा शोध सुरू असताना गोपनीय बातमीदाराकडून तपास पथकाला माहिती मिळाली की, पिडीत महिलेने दिलेल्या माहितीचे आधारे, रेखाटण्यात आलेले रेखाचित्र हे इसम नामे जाक्या कोंडक्या चव्हाण रा. लिंगाळी ता. दौंड जि पुणे याचे वर्णनाशी मिळते जुळते आहे, अशी माहिती मिळाली.
तपास पथकाने संशयित इसम जाक्या चव्हाण याचा शोध सुरू केला, त्याचे बाबत गोपनीय माहिती मिळविली असता, त्याचे वर्णन व पेहराव हा गुन्हयातील आरोपीशी मिळता जुळता असल्याची खात्री पटली. त्यानंतर दि. १८/१०/२०२५ रोजी तपास पथकाने आरोपी जाक्या कोंडक्या चव्हाण, वय ३० वर्षे रा. माळवाडी, लिंगाळी ता. दौंड जि पुणे यास लिगळी परिसरातून ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले आहे. आरोपी जाक्या कोंडक्या चव्हाण, यास मा. न्यायालयात उपस्थित केले असता, त्याची दि. २६/१०/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आली आहे. सदर आरोपीकडून गुन्हयात वापरलेली यूनिकॉर्न मोटार सायकल नं. एम.एच.४२ ए.जी. २६४८ हो जप्त करणेत आली सदरची मोटार सायकल ही आरोपी जाक्या चव्हाण याचे नावावर आहे. तसेच त्याचेवर यापुर्वी दौंड पो स्टे गु.र.नं. २५१/२०२५ भा.न्या.सं.क. ३३१ (४), ३०५ प्रमाणे घरफोडी चोरीचा एक गुन्हा दाखल आहे
सदरची कामगिरी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बापूराव दडस, दाँड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पो स्टे चे पो नि गोपाळ पवार, भिगवण पो स्टे चे सपोनि विनोद महांगडे, स्था.गु.शा.चे सपोनि कुलदीप संकपाळ, दौड पोस्टे चे पोसई रूपेश कदम, भिगवण पोस्टे चे पोसई अमित पाटील, स्थागुशाचे श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, तपास पथकातील अंमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, अमीर शेख, महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, यांनी केली असून पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशन करत आहेत.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!