पुणे शहरात मोठया प्रमाणात वाहनांचे संख्येमध्ये झालेली वाढ आणि विविध मोठे प्रकल्प यामुळे नागरिकांना मोठा धोका य गैरसोय होते.
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- शहरात मोठया प्रमाणात वाहनांचे संख्येमध्ये झालेली वाढ आणि विविध मोठे प्रकल्प (मेट्रो. उड्डाणपूल, विविध विकासकामे) सुरु असल्यामुळे तसेच अवजड वाहनांमुळे रस्यावरील जागा मोठया प्रमाणावर व्यापली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना मोठा धोका य गैरसोय होते.
त्याकरिता जनतेस पोहचणारा धोका अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६ / ८७१ / सी. आर. नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५ ३७ । टी. आर. ए, २. दिनांक २७/०९/१९९६ चे ११६ (१) (२) (बी), ११६(४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन मी शशिकांत बोराटे, पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, पुणे शहर, पुणे शहरामधुन पिंपरी चिंचवड, सोलापूर, अहमदनगर, सातारा, मुंबई व इतर ठिकाणी जाणारी व येणारी सर्व प्रकारची जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रेलर, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल वाहने, आर्टिक्युलेटेड माहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर खालील प्रमाणे दिनांक ०५/०३/२०२४ रोजी पासुन नव्याने आदेश निर्गगीत करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी असलेले वाहतूकीचे सर्व आदेश रद्द समजण्यात येतील.
१. पुणे नगर मार्गावरून वाघोली पासुन पुणे शहराकडे २४ तास प्रवेश बंद राहील,
> पर्यायी मार्ग पुणे नगर रोडवरील शिक्रापूर येथुन उजवीकडे दळण घेवून बाकण मार्गे पिपरी चिंचवड व तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे जातील. तसेच वरील मार्गावरूनच अहमदनगरकडे जातील.
२. पुणे सोलापूर व पुणे सासवड रोडने येणाऱ्या वाहनांना हडपसर नोबल हॉस्पिटल चौक खराडी बायपास चौकाकडे २४ तास प्रवेश बंद राहील.
• पर्यायी मार्ग १ पुर्ण सोलापूर रोडवरून येणान्या वाहनांनी थेऊर फाटा येथून उजवीकडे वक्षण घेवून बेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे जावे
पर्यायी मार्ग २: पुर्ण सासवड रोडवरून येणाऱ्या वाहनानी हडपसर येथे यु टर्न घेवून थेऊर फाटा देधुन डावीकडे वळण घेवून येऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे पर्यंत जाये.
खालील नमुद मार्गावर वरील प्रकारच्या वाहनांना सकाळी ०७:०० ते २१:०० वा. पर्यंत प्रवेश बंद राहील.
३. पुणे सोलापूर रोड येधुन सातारा, मुंबई कडे जाणान्या वाहनांनी हडपसर येथुन डावीकडे वळण घेवून सासवड रोडवरून मंतरवाडी फाटा उजवीकडे वळण घेवून खड़ी मशीन चौक ते कात्रज चौक येथून सातारा कडे किंवा नवले पुल मार्गे मुंबईकडे जातील, तसेच सासवडकडून येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडी चौकामधून डावीकडे वळण घेवून वरील मार्गाचा वापर करावा
४. मुंबई कडुन येणारी वाहने नवले मूल डावीकडे वळण घेवून कात्रज चौक तसेच साताराकडून येणारी वाहने कात्रज चौक येथून खडी मशीन चौक मंतरवाडी चौक डावीकडे वळण घेवून हडपसर मार्ग सोलापूर कडे व मंतरवाडी चौकामधून उजवीकडे वळण घेवून सासवडकडे जावे.
तसेच वरील प्रमाणे सर्व प्रकारच्या वाहनांना खालील नमुद ठिकानांपासून शहराचे अंतर्गत भागामध्ये येण्यास २४ तास प्रवेश बंद असेल.
१. सोलापूर रोड नोबल हॉस्पिटल चौक
२ . अहमदनगर रोड केसनंद फाटा पाचोली
३. मुंबई पुणे रोड हॅरीस बीज,
४.औध रोड राजीव गांधी पुल,
५. बागेर रोड हॉटेल राधा चौक,
६.पाषाण रोड रामनगर जंक्शन,
७.पौड रोड चांदणी चौक,
८ सिंहगड रोड वडगाव पुल चौक,
९ . सातारा रोड कात्रज बौक
१०. सासवड रोड (बोपदेव घाट मार्ग) खडी मशीन चौक
११. कात्रज मंतरपाठी बायपास रोड चंडी चौक
१२. आळंदी रोड बोफखेल फाटा चौक

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

