खडक पोलीस स्टेशन मार्फत बाल संरक्षण बाबत जनजागृती


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- बालकांवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी खडक पोलीस स्टेशन मार्फत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासाठी चर्चा सत्र आयोजित केले.

बालकांवर होत असलेले अत्याचार प्रमाण वाढत आहेत हे रोखणे सर्वांचे कर्तव्य आहे. शाळांमध्ये मुलांना सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श याबाबत माहिती देणे. त्यांना नाही म्हणायला सांगणे त्या ठिकाणाहून पळून जाऊन विश्वातील व्यक्तीला सांगणे. याबाबत माहिती द्यावी. शिक्षक म्हणून आपली भूमिका व पालकांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान संस्थेमार्फत समुपदेशक प्रमोद पाटील यांनी दिली.

आज दिनांक 28/08/2024 रोजी दुपारी 13/30 वा ते 14/30 वा चे दरम्यान खडक पोलीस स्टेशन येथे खडक पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा व कॉलेज यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांची मीटिंग घेण्यात आली सदर मीटिंगमध्ये उपस्थित यांना खालील प्रमाणे मार्गदर्शन सुचना देण्यात आल्या

१. सुरक्षीततेच्या दृष्टीने परिसरामध्यं सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात यावे.
२. शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करताना त्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी.
३. कंत्राटी पद्धतीने नेमले जात असल्याने सुरक्षा रक्षक, सफाईकामगार, मदनिस, स्कुल बस चालक, मालक, मदतनिस इ. व्यक्तीची पार्श्वभुमी शाळा पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात यावी. व्यवस्थापनाकडून होणे आवश्यक आहे. या साठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत करण्यात यावी.
४. कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करताना ०६ वर्षा खालील विद्यार्थासाठी महिला कर्मचाराची नियुक्ती साठी प्राधान्य देण्यात यावे.
५. शाळेतील विद्यार्थाच्या सुरक्षते बाबत तक्रार पेटी बसविणे आवश्यक असुन त्याचा वापर प्रभावी पणे करित आहे का कसे याची तपासणी होणे आवश्यक आहे.
६. शाळेतील विद्यार्थ्यां सोबत अनुचित प्रकार घडल्यास हे उघड झाल्यानंतर संबंधित शाळासी.सी.टी.व्ही व्यवस्थापन/संस्था/मुख्याध्यापक/शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी२४ तासाच्या आत संबंधित शिक्षण अधिकारी यांना कळविण्यात यावे.
७. वेळोवेळी सर्व स्टाफ ची मिटींग घेणे व सर्वाबरोबर संवाद करणे.
८. एक शिक्षक/शिक्षीका जे मुलीबरोबर मैत्रि पूर्ण संबंध ठेवील अशी तजबोज ठेवावी.
९. मुलांचे लैंगिक शोषण होते त्यांच्या अनुषंगाने शिक्षकाकरवी बोलते ठेवावे.
१०. शाळेच्या १०० मीटर परिसरात रोडरोमिओ, पान टपरी, आपल्या निदर्शनास आल्यास पोलीस स्टेशनला कळविण्यात यावे.
११. शाळेमध्ये बॅड टच/गुड टच या बाबत वेळोवेळी मुलांना मार्गदर्शन करण्यात यावे. १२. वेळोवेळी शाळेमध्ये पालकांची मिटींग घेवुन मार्गदर्शन करण्यात यावे.

१२. स्कुल बस चालक, मालक, मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी करुन वेळोवेळी मिटींग घेण्यात यावे.
सदर मीटिंग करता श्रीमती शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक गुन्हे, गोपनीय अंमलदार दामिनी मार्शल, निवेदिता कोंढाळकर, सुप्रिया मगदूम व मुख्याध्यापक / प्राचार्य हजर होते.
जनसमुदाय 30 ते 32 व शशिकांत चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!